Search best Flipkart deals

Saturday, July 12, 2014

भयसापळा, मोहसापळा आणि हौदातील थयथयाट

गुरुजी आपल्या शिष्या सोबत डोंगराच्या दिशेने चढता चढता सांगतात की, तु माझी आज्ञा पाळली तर, शिखरावर पोहचल्यावर तुला जिवनाचे अंतिम सत्य सांगतो आणी ते चालु लागतात..
"संत ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टान्त"
आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे.
त्यांनी सांगितले आहे, की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे.
एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते.
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो.
ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत
राहते.
खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.
पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही,
तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
"हा आधार गेला तर," अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.
(हा दृष्टान्त मुळात कोणाचा हे आठवत नाही)
एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व
शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा!
थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय.
या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं.
"अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल!" कोणीतरी समजावत आहे.
पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?
अंतीम सत्त्य
"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.
""नाही गुरुजी.
मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.''
"माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते
सत्य सांगेन' असं म्हणालो होतो मी.''
"होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..''
"कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?''
"ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.''
"शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''.
"पण शिखर न येताच?''
"तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून!"
ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच.
ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं!
तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच;
फक्त "पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच!
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा.
माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं,
थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा.
चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा.
हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात.
त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते;
पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.. .

Sunday, July 6, 2014

डॉक्टरची गोष्ट

एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल
आला... खुप
घाई करून
तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये
पोहोचला... त्याने
पटकन
सगळ्या नर्स
ऑपरेशनची तयारी करण्यास
सांगितले,
स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन
ऑपरेशन
थिएटर जवळ
आला...
तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे
वडील हॉल
बाहेर रागात
चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट
पाहताय...
डॉक्टरांना पाहताच
त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व
ते
रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे
यायला इतका वेल
का घेतला? तुम्हाला कळत
नाही का माझ्या मुलाचे प्राण
धोक्यात आहे ते?
तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव
आहे
की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत
म्हणाला "मला माफ करा,
मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन
आल्यानंतर
जितक्या लवकर येता आले
तितक्या लवकर आलो,
आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत
व्हा..
मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा?? जर
तुमचा मुलगा आता ऑपरेशन
थिएटर मध्ये
असता तर?? जर
तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु
च्या जबड्यात असता तर तुम्ही काय
केल
असतं??" वडील
रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत
म्हणाले
"मी तेच
सांगतो जे पवित्र पुस्तकांमध्ये
लिहिलेले आहे
की हे शरीर
नश्वर आहे, शरीर मातीतुन तयार झाल
आणि शेवटी मातीतच
मिसळणार, अगदी आम्ही डॉक्टर
जरी असलो तरी आम्ही काय देव नाही..
आता तुम्ही शांत
व्हा आणि देवा जवळ प्रार्थना करा...
मी माझे
पुर्ण प्रयत्न
करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर
मध्ये
गेला तसे
वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात
राहिले
आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात
बाहेर
आले
आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले
"अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...
आम्ही तुमच्या मुलाला वाचावल"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद
गगनात
मावेनासा झाला...
ते डॉक्टर ना धन्यवाद म्हणाले..
डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रीया दिली नाही आणी ते
तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग वडिलांना आश्चर्य
झाला आणि ते
शेजारी उभ्या असलेल्या नर्स
ला रागात
म्हणाले
"किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे
हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत
म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल
अपघातात वारला... आज ते
त्याचा अंतिम
संस्कार करत होते
जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी फोन
केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम
संस्कार अर्धवट
सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी आले
आणि आता अंतिम संस्कार पुर्ण
करण्यासाठि पटकन गेले...
अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक
मुलगा मेला तो काय गर्व
आणि माज करणार"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सन्न झाले..
आणि त्यांना खुप
पश्चाताप झाला...
सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये
कारण तुम्हाला नसतं माहित त्याने
काय भोगलय...

रिकामा ग्लास

मानसशास्त्राचा तास होता .
एका शिक्षिकेने
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात
धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक
नजर टाकली .
प्रत्येकाला वाटले की आता मॅडम
विचारतील
की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ?
पण एक स्मित हास्य करुन मॅडम ने
प्रश्न केला, "या ग्लासचं वजन
किती असेल कुणी सांगेल का ?"
कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर
कुणी 200
ग्रॅम . एक जण तर
म्हणाला - मॅडम, अर्धा किलो !
मॅडम ने पुन्हा एकदा स्मित हास्य करुन
बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन
मोजमाप करुन सांगितल्याने
फारसा फरक पडणार नाही !
मुळात वजन काहिही असो, जर
का मी हा ग्लास एक
मिनीट असाच धरुन ठेवला तर
मला काही त्रास होणार नाही . एक तास
धरुन ठेवला तर हात दुखेल .
आणि दिवस
भर असाच ठेवला तर ... ? तर हात खुप
जड होईल,
ईतका की बधीर होउन निकामीच
ह्वावा ...
आपल्या आयुष्यातील तणाव अन्
चिंतांच पण असंच असतं . क्षण भर
विचार करा , काही वाटणार
नाही . पण
मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन
पण असंच जड होत होत
बधिर होईल ! ईतकं
की तुम्ही काही करुच शकणार
नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं
सोडा . मनाला हलकं करा .
आणि निरंतर अल्हाद दायक जिवन
जगायला शिका ...
आयुष्य खुप सुंदर आहे