Search best Flipkart deals

Showing posts with label बोधकथा. Show all posts
Showing posts with label बोधकथा. Show all posts

Sunday, July 6, 2014

डॉक्टरची गोष्ट

एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल
आला... खुप
घाई करून
तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये
पोहोचला... त्याने
पटकन
सगळ्या नर्स
ऑपरेशनची तयारी करण्यास
सांगितले,
स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन
ऑपरेशन
थिएटर जवळ
आला...
तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे
वडील हॉल
बाहेर रागात
चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट
पाहताय...
डॉक्टरांना पाहताच
त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व
ते
रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे
यायला इतका वेल
का घेतला? तुम्हाला कळत
नाही का माझ्या मुलाचे प्राण
धोक्यात आहे ते?
तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव
आहे
की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत
म्हणाला "मला माफ करा,
मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन
आल्यानंतर
जितक्या लवकर येता आले
तितक्या लवकर आलो,
आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत
व्हा..
मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा?? जर
तुमचा मुलगा आता ऑपरेशन
थिएटर मध्ये
असता तर?? जर
तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु
च्या जबड्यात असता तर तुम्ही काय
केल
असतं??" वडील
रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत
म्हणाले
"मी तेच
सांगतो जे पवित्र पुस्तकांमध्ये
लिहिलेले आहे
की हे शरीर
नश्वर आहे, शरीर मातीतुन तयार झाल
आणि शेवटी मातीतच
मिसळणार, अगदी आम्ही डॉक्टर
जरी असलो तरी आम्ही काय देव नाही..
आता तुम्ही शांत
व्हा आणि देवा जवळ प्रार्थना करा...
मी माझे
पुर्ण प्रयत्न
करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर
मध्ये
गेला तसे
वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात
राहिले
आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात
बाहेर
आले
आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले
"अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...
आम्ही तुमच्या मुलाला वाचावल"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद
गगनात
मावेनासा झाला...
ते डॉक्टर ना धन्यवाद म्हणाले..
डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रीया दिली नाही आणी ते
तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग वडिलांना आश्चर्य
झाला आणि ते
शेजारी उभ्या असलेल्या नर्स
ला रागात
म्हणाले
"किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे
हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत
म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल
अपघातात वारला... आज ते
त्याचा अंतिम
संस्कार करत होते
जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी फोन
केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम
संस्कार अर्धवट
सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी आले
आणि आता अंतिम संस्कार पुर्ण
करण्यासाठि पटकन गेले...
अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक
मुलगा मेला तो काय गर्व
आणि माज करणार"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सन्न झाले..
आणि त्यांना खुप
पश्चाताप झाला...
सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये
कारण तुम्हाला नसतं माहित त्याने
काय भोगलय...

Friday, May 9, 2014

मौल्यवान काय? सोने की चांदी?



एका गावात एक विद्वान अर्थतज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर
पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक गावाच्या राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले . तो विद्वान राजाला भेटायला गेला .
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा त्या विद्वानाला म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा
असा बावळट का ? काही त्याला शिकवा त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय साधे ईतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने
हसू लागला हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
त्याने तुझ्यावर असला आरोप का लावला . या आधीपण लोकं मला
या बाबी वरुन हसायचे पण आता माझी चार लोकात खिल्ली
उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे
मग लोकं असे का करतात सांग मला"
" लोकांवर रुबाब करायसाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलवून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किंमती नाणे उचल ..
आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
पण मला सोने आणि चांदी याचे मुल्य कळत नाही असे त्यांनी
तुम्हाला का सांगीतले मला खरचं माहीत नाही ......."
विद्वान मुलाचे हे उत्तर ऐकून खूप विचारात पडला
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"
मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी
हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "


जीवनातही असे बर्‍याचं वेळा होते कोणाला मूर्खात काढण्यासाठी
आपण विनाकारण आपले नुकसान करुन घेतो .. आणि कधी
कोणी विनाकारण आपणास मुर्खात काढते पण त्यातून आपला फायदाचं होतो
हा एक खेळचं असतो कोणी हरत जिंकते आणि कोणी फक्त जिंकते .....
कोणी जिंकताना दिसते आणि कोणी न दिसताचं जिंकते ......
कोणत्याही बाजूला राहून खेळा ... मात्र नेहमीचं सकारात्मक असा.....
कोणी आपणास किती ही मुर्खात काढले तरी उगाच मनाला त्रास नका
करुन घेवू ... त्या गोष्टीला सकारात्मकतेने सामोरे जा आणि
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा ...
काय वाटते ????