Search best Flipkart deals

Thursday, August 7, 2014

शिक्षक आणि मुले

“शनिवार जाईल, रविवार जाईल,
आणि सोमवारी तुम्ही नेहमीसारखेच शाळेत जाल
आणि पहिल्या तासावर आपल्या वर्गात शिराल. अशाच
मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या.
इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईना वर्गात बोलणे
सुरु करताना “love you All” असं म्हणायची सवय होती.
तसं त्या म्हणाल्याही. पण त्याना जाणवलं कि आपण हे खर
मनापासून म्हणत नाही आहोत. त्याला कारण
शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.
तो मुलगा अगदी अव्यवस्थित,
गबाळ्या असा होता आणि साठे बाईना त्याच्याबद्दल प्रेम
किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं,
त्या मुलात काहीही नव्हत! त्या,
त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच वागायच्या.
कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी त्याचं उदाहरण
द्यायच्या. आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत
त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.
पहिली तिमाही झाली. प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले.
त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत
असते कि प्रगतिपुस्तकावर मुख्याध्यापिकेची सही होते.
त्या प्रमाणे प्रगती पुस्तके सही साठी गेली.
मुख्याध्यापिकेने साठे बाईना बोलवून घेतले. त्या म्हणाल्या,
“अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.
पालकांना कळायला हवे कि त्यांच्या मुला-
मुलीना काही भवितव्य आहे. या शैलेश बद्दल तुम्ही काहीच
लिहिले नाहीये. अस कसे चालेल? त्याच्या पालकांना काय
वाटेल? अहो त्याला ते मारतील सुद्धा एखादेवेळी!” साठे बाई
म्हणाल्या, “ मी त्या मुलाच करू तरी काय? अहो,
सकारात्मक काही नसेल, काही प्रगती नसेलच तर मी काय
लिहू?” “ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा.”
मुख्याध्यापिका म्हणाल्या.
मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे
सांभाळणार्या व्यक्तीला बोलावून घेतले
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले.
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके साठे बाईंकडे पाठवून दिली.
साठे बाईनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.
तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता, “शैलेश हा वर्गातील
सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे!”
त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे
प्रगतीपुस्तक पाहिले, त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे
सुचवत होते कि, त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू
खाली येतो आहे.
त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग
आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई
त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.
आणि ते हळूहळू त्या शेऱ्यामधून ध्वनीत होत होते. सहावीत
शेरा होता, “ शैलेशने त्यांची आई गमाविली आहे,
आणि तो स्वत:हि हरवल्यागत झाला आहे. आता त्याच्याकडे
अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण
त्याला गमावू!
आतापर्यंत साठेंच्या डोळ्यात अश्रू साठले होते. त्या तशाच
मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या, “मला कळले
काय करायला पाहिजे ते!”
त्या जेंव्हा पुन्हा सोमवारी वर्गावर गेल्या आणि वर्गावर
नजर फिरवली, आणि, नेहमी प्रमाणे म्हणाल्या, “love you
All”! पुन्हा त्याना जाणवलं कि आपण खर बोलत नाही आहो.
कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल
वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेश
विषयी वाटत होती!
त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होत. आता शैलेशला हाक
मारताना त्यांचा स्वर बदलला होता.
त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या. दिवस जात होते.
शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher
साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या. एकच ‘गिफ्ट’
एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.
शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यानी ओळखले हि कोणाची गिफ्ट
आहे ते. एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन
खडयांच्या बांगड्या. एका बांगडीतले दोन खडे आधीच
निखळलेले होते. सगळी मुले हसली. त्यानी ती गिफ्ट
शैलेशची आहे हे ओळखल.
काही न बोलता साठे बाईनी तो परफ्युम आपल्या साडीवर
उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.
आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,
“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”
“ती मला सोडून गेली त्या आधी तिने
वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.
आणि शेवटी तीच्या हातात ह्याच बांगड्या होत्या!”
एक वर्षानंतर, म्हणजे शाळा संपली तेंव्हा, साठे
बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-
शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात.”
शैलेश. त्या नंतर, बरीच वर्षे, दर वर्षी, शैलेशकडून याच
आशयाचे पत्र त्याना मिळत असे.
वर्षे निघून गेली. त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान
त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत
आला. त्याने एक पत्र त्याना दिले. त्यावर प्रेषक महणून
नाव होत, डॉ. शैलेश, ph.D. या दरम्यान शैलेश
मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट
मिळविली होती.
पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने. “मला जगात
खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वात छान आहात!” “मी लग्न
करतोय. आणि, तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न
करण्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही.” सोबत
विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे. साठे
बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता. पण त्या बांगड्या मात्र
अजूनही त्यांच्या हातात होत्या.
साठे बाईना राहवले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे
अपरिचितच जास्त होते त्या मुले त्या मागच्या एका रांगेत
बसून चाललेला सोहळा पहात होत्या. मात्र
कुणीतरी त्याना शोधत होते. त्यांनी त्याना ओळखले
आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर
चिट्ठी लावलेली होती. “आई”. शैलेश त्याना पाहून
सोहळा थांबवून त्यांच्या पाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने
खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला,
तुम्ही माझ्या आई पेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे
तो तुमच्या मुळे.
लग्न पार पडले. जोड्याने
पुन्हा पाया पडायला आला तेंव्हा नवपरिणीत
पत्नीला म्हणाला, “ह्या नसत्या तर आज जसा मी आहे
तसा कधीच घडलो नसतो!” साठे बाई म्हणाल्या, ‘शैलेश जर
माझ्या वर्गात नसता तर मला कधीही कळल नसत
की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असण जास्त
जरुरीच आहे, मग शिक्षक होणे.”
“माझी इथे आलेल्या सर्व शिक्षकांना विनंती आहे.
तुमच्याही वर्गात एक शैलेश असेल.
तुम्ही जेंव्हा सोमवारी पुन्हा शाळेत तुमच्या वर्गावर जाल,
तेंव्हा तुम्हीही त्या ‘शैलेशची’ आई बनु शकाल!”
तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही फक्त शिक्षक म्हणून जाऊ नका.
पालक म्हणून जा. आणि मला विश्वास आहे की आपण
एका ‘शैलेश’ चे आयुष्य बदलू शकाल!”
बद्दल घडवीने हे आपले कर्तव्यच आहे

No comments:

Post a Comment